लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या व्हेलेंटाईन वीक सुरु आहे. या वीकमध्ये येणारा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. यादिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना चॉकलेट गिफ्ट करतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात.
चॉकलेट डेच्या पूर्वीच मार्कटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिळायला सुरुवात होते. तरुणाईमध्ये चॉकलेट डेची क्रेझ जास्त पाहायला मिळते. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. जर तुम्हाला गोड खाणं आवडत असेल आणि काही तरी खास आठवणी करायच्या असतील तर तुम्ही चॉकलेट डे साजरा करायला विसरु नका.
चॉकलेट डेला व्हेलेंटाईन वीकमधील सर्वात आवडता दिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येक व्यक्ती एकमेकांना चॉकलेट देतात. चॉकलेट डेच्या दिवशी आपल्या पार्टनरला चॉकलेट देऊन तुम्ही नातं आणखी मजबूत करु शकता. चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडतो.
चॉकलेट डेचा इतिहास
सर्वात आधी अमेरिकेमध्ये चार हजार वर्षांपूर्वी कोकोचे झाड पाहिले गेले होते. अमेरिकेच्या जंगालात असलेल्या कोकोच्या बियांपासून चॉकलेट तयार केले गेले. जगात सर्वात आधी अमेरिका आणि मॅक्सिकोमध्ये चॉकलेटचा प्रयोग करण्यात आला होता. असे सांगितले जाते की, 1528 मध्ये स्पेनच्या राजाने मॅक्सिकोवर कब्जा केला. या राजाला कोको खूप आवडत होते. त्यानंतर राजाने कोकोच्या बीया मॅक्सिकोवरुन स्पेनला घेऊन गेला. त्यानंतर स्पेनमध्ये चॉकलेट खाण्यास सुरुवात झाली.
1829 मध्ये कॉनराड जोहान्स वान हॉटन नावाने कोको प्रेस नावाची मशीन तयार करण्यात आली. असे सांगितले जाते की, आधी चॉकलेटची चव तिखट होती. पण जोहान्सने जी मशीन तयार केली त्यामधून चॉकलेटचा तिखटपणा दूर करण्यात आला. 1848 मध्ये ब्रिटिश चॉकलेट कंपनी जे. एर फ्राई अॅण्ड सन्सने कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर मिक्स करुन त्यापासून चॉकलेट तयार केले. अशापद्धतीने वेळेनुसार चॉकलेटच्या चवीमध्ये देखील बदल होत गेले.
चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर
चॉकलेट आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेट गुणधर्म असतात. त्यामुळे चॉकलेट ब्लड फ्लो, हार्ट, स्किन यांच्यासाठी फायदेशीर मानले जाते. चॉकलेट खाल्ल्यामुळे मूड देखील चांगला होतो. चॉकलेट खाल्ल्याने लव्ह लाईफ निरोगी राहते. वैज्ञानिकदृष्ट्या ,चॉकलेटमध्ये असलेले थिओब्रोमाइन आणि कॅफीन मेंदूत एंडोर्फिन सोडतात,ज्यामुळे मन आणि शरीराला आराम वाटतो.
1) तणाव असो वा नैराश्य – आपण कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असाल तर चॉकलेट हे आपले मित्र आहे,हे आपला तणाव कमी करतात. जेव्हा आपण तणाव किंवा नैराश्यात असतो तेव्हा चॉकलेट खायला विसरू नका. यामुळे आपल्याला आराम वाटेल.
2) त्वचा तरूण ठेवते – चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या त्वचेवर दिसणाऱ्या सरत्या वयाची चिन्हे आणि सुरकुत्या कमी करतात. यामुळे आपली त्वचा तरुण दिसते. चॉकलेटच्या गुणधर्मांमुळे, सध्या चॉकलेट बाथ, फेशियल, पॅक आणि वॅक्स देखील वापरले जात आहेत.
3) रक्तदाब कमी असल्यास – ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी चॉकलेट खूप फायदेशीर आहे. लो ब्लड प्रेशरमध्ये चॉकलेट लगेच आराम देते. म्हणूनच चॉकलेट नेहमी सोबत ठेवा.
4) कोलेस्ट्रॉल – शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चॉकलेट खूप फायदेशीर आहे. एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करून लठ्ठपणा आणि त्यामुळे होणाऱ्या इतर आजारांवर नियंत्रण ठेवण्यासही हे उपयुक्त आहे.
5) मेंदू निरोगी राहते – एका संशोधनानुसार, दररोज दोन कप हॉट चॉकलेट ड्रिंक प्यायल्याने मेंदू निरोगी राहतो, आणि स्मरणशक्ती कमजोर होत नाही. चॉकलेट मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते.
6) हृदयरोग- एका संशोधनानुसार, चॉकलेट किंवा चॉकलेट ड्रिंकच्या सेवनाने हृदयविकाराची शक्यता एक तृतीयांश कमी होते आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
7) एथेरोस्क्लेरोसिस – एथेरोस्क्लेरोसिस हा एक प्रकारचा रोग आहे, ज्यामध्ये रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. अशा परिस्थितीत चॉकलेट खाणे खूप फायदेशीर आहे.