तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

कोल्हापूर: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या . फुलेवाडी रिंगरोडवरील माऊली नगरात एका महाविद्यालयीन तरुणीने घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रिया केरबा जाधव (वय २१) असे त्या तरुणीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रिया जाधव हिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. तिचे वडील कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आहेत. रोज रात्री तिच्यासोबत लहान भाऊ झोपत होता. सोमवारी रात्री घरी नेहमीप्रमाणे वातावरण होते.

तिने आपल्या लहान भावाला आईच्या बेडरूममध्ये झोपण्यास सांगितले. त्यानंतर मंगळवारी सकाळी तिने बेडरूमचा दरवाजा उघडला नाही, त्यासाठी आईने तिला हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घरातील सर्व जण गोंधळून गेले.

बेडरूमचा दरवाजा तोडून काढला. त्यावेळी प्रिया जाधव हिने बेडरूममध्येच छताच्या पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. तिच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, मोठी बहीण असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.