संतापजनक; पत्नीचा उपवास, डॉक्टरांना यायला उशीर… उपचाराविना बालकाचा मृत्यू…

0

 

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शासनाने लाख दावे करूनही आरोग्य विभागाची यंत्रणा रुळावर येत नसल्याने मध्यप्रदेशात ग्रामीण भागात निकृष्ट आरोग्य सेवा लोकांच्या जिवावर बेतली आहे.

बरगी च्या आरोग्यम आरोग्य केंद्रात निष्काळजीपणाचा कळस गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. जो कोणी ऐकेल त्याचा आत्मा हादरेल, रुग्णालयात उपचाराअभावी निष्पाप मुलाचा आपल्या आईच्या मांडीवरच वेदनेने विव्हळत मृत्यू झाला आहे. चरगवां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्हेटा देवरी येथील रहिवासी संजय पांद्रे यांनी त्यांचा ५ वर्षाचा मुलगा ऋषी पांद्रे याला उपचारासाठी बरगी येथील आरोग्यम आरोग्य केंद्रात आणले होते, मात्र तेथे ना कोणी जबाबदार अधिकारी होता ना दवाखान्यात डॉक्टर होते.

असह्य आई आणि कुटुंबीयांनी बराच वेळ मुलासह रुग्णालयाच्या दारात थांबले, मात्र अनेक तास डॉक्टर न पोहोचल्याने या निष्पाप बालकाचा रुग्णालयाच्या उंबरठ्यावरच मृत्यू झाला. आश्‍चर्याची बाब म्हणजे या निष्पापाचा मृत्यू होऊन अनेक तास उलटले तरी ना हॉस्पिटलमध्ये तैनात असलेले डॉक्टर, ना परिसरातील बीएमओ पोहोचले. त्यामुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून त्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे.

वेळीच उपचार मिळाले असते तर मुलाचे प्राण वाचले असते, असे संतप्त नातेवाईकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याचे लाखो दावे मध्यप्रदेशात केले जात असले तरी रुग्णालयाच्या दारातच आईच्या कुशीत 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याने व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

त्यात संतापजनक बाब म्हणजे, येथे काही तास उशिरा आलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी उशिरा येण्याचे वेगळेच कारण सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी उपवास करत होती, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. ग्रामीण कुटुंबाने आपल्या 5 वर्षाच्या निष्पाप मुलाला कायमचे गमावले आहे, मात्र या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.