छत्तीसगड पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्तीसगड राज्यातील कांकेर येथील कोयालीबेडा परिसरात पोलीस आणि नक्सलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर झाली आहे. यात ३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यासोबतच काही नक्षली जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या पोलिसांनी परिसरात सर्च मोहीम राबवली असता, या परिसरात शस्त्रसाठा देखील आढळून आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात डीआरजी आणि बीएसएफने संयुक्त ऑपरेशन राबवित नक्षलवाद्यांच्या छुप्या कारवाईचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईमध्ये सुरक्षा दलांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे कांकेरचे एसपी इंदिरा कल्याण एलेसेला यांनी स्पष्ट केले आहे.

तीन नक्षल्यांना कंठस्नान
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने घातपाताचा घटना घडवण्याच्या बेतात असलेले काही नक्षली कांकेर येथील कोयलिबेडा परिसरातील जंगलात जमा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्च मोहीम राबवली. रम्यान काही नक्षल्यांचा मागवा पोलिसांना लागला असता त्या दिशेने पोलीस जात असतांना अचानक अंदाधुंद गोळीबार झाला. नक्षलवाद्यांच्या या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना पोलिसांनी देखील गोळीबार केला. यात ३ नक्षल्यांचा खात्मा झाला असून, २ शस्त्र हस्तगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा राखीव दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकांनी मिळून राबविलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला हे यश आले असून, कोयलीबेडा परिसरातील जंगलात सुरू असलेला नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.