भारताने चंद्रावर दाखवली ताकद, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेवत एक इतिहास रचला आहे. ISRO च्या सर्व वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदि हे दक्षिण आफ्रिकेतून व्हिडीओ कॉन्फ्रेन्सिंग च्या माध्यमातून मोहोमेवर लक्ष ठेऊन होते.

चांद्रयान-३ सह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वाहन उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्राच्या कोणत्याही भागात वाहन उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. भारतापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन (आता रशिया) आणि चीन यांना चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करता आले आहे.

चांद्रयान-३ चे लँडर विक्रम चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहे. आता तेथील धूळ शांत झाल्यावर विक्रम चालू होईल आणि संवाद साधेल. त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर रॅम्पवरून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. यानंतर त्याची चाके चंद्राच्या मातीवर अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील. त्यानंतर ‘विक्रम’ ‘लँडर’ प्रग्यानचा फोटो घेईल आणि प्रज्ञान विक्रमचा फोटो काढेल. ते हा फोटो पृथ्वीवर पाठवतील.

Leave A Reply

Your email address will not be published.