चांद्रयान -३ आज दुपारी अवकाशात झेपावणार !

0

 

श्रीहरीकोटा ;- आज चांद्रयान दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी प्रक्षेपित होणार आहे. दुपारी २.३५ वाजता ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले. अपयशाच्या स्मृती विसरून नव्याने चंद्रावर स्वारी करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि चांद्रयान ३ सज्ज झालं आहे. थोड्याच वेळाच चांद्रयान ३ श्रीहरीकोटा येथील तळावरून अवकाशात झेपावणार आहे.‘चंद्रयान-१’ आणि ‘चंद्रयान-२’ यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार होता. मात्र चंद्रयान-३ प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे.

चंद्रयान-३ या यानात लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडय़ुल आहे, ते स्वत:हून अंतराळात जाऊ शकत नाही. त्यामुळे ‘एलव्हीएम-३’सारख्या प्रक्षेपण यानाद्वारेच हे यान अंतराळात झेपावू शकते. ‘एलव्हीएम-३’ या प्रक्षेपण यानात शक्तिशाली प्रणोदन प्रणाली (पुढे ढकलण्याची क्रिया) असते, जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून उपग्रहासारख्या अवजड वस्तूंना अवकाशात उचलण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकते
२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशत: अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली

आज प्रक्षेपण, २३ ऑगस्टला चंद्रावर उतरणार!

दुपारी २.३५ वाजता ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले. हे यान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चांद्रयान ३ चं प्रक्षेपण पाहाण्यासाठी सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावर २०० शाळकरी विद्यार्थी दाखल! झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.