विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळा, चांद्रयान-3 ‘या’ दिवशी उतरणार चंद्रावर !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या चांद्रयानचं विक्रम ‘लँडर मॉड्यूल’ (lander module) ‘प्रॉपल्शन मॉड्यूल’पासून यशस्वीरीत्या वेगळं झालं आहे. महत्वाचं म्हणजे चांद्रयान-३ चा आत्तापर्यंचा प्रवास नियोजित वेळेत पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता चांद्रयान-३ चंद्रावर उतरवण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहिमेकडे अवघ्या जागाच लक्ष लागले आहे.

चांद्रयान-३ मोहिमेचा आणखी आणखी एक यशस्वी टप्पा
इस्रोने याआधी सांगितलं होत की, १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळा होईल. इस्रोने ट्विट करत लिहिलं आहे की, लँडर मॉड्यूल म्हणाले की, प्रवासातही धन्यवाद, मित्रा ! लँडर मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूल पासून यशस्वीरीत्या वेगळं करण्यात आलं आहे. उद्या दुपारी ४ वाजता नियोजित डिबूस्टिंग होईल, त्यानंतर लँडर मॉड्यूल चंद्रापासून जवळच्या कक्षेत लँडिंगसाठी सेट करण्यात येईल.

‘या’ दिवशी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार?
चांद्रयान-३ चं १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा (Sriharikota) येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरीत्या प्रक्षेपण पार पडलं. १ ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. इस्रोने याआधी सांगितल्याप्रमाणे, मोहिमेचे सर्व टप्पे नियोजित वेळेत पार केल्यास चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. इस्रोने याआधी सांगितल्याप्रमाणे, मोहिमेने सर्व टप्पे नोयोजित वेळेत पार केल्यास चांद्रयान-३ २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिल्या माहितीनुसार, “जर सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर चंद्रयान २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५. ४७ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.”

Leave A Reply

Your email address will not be published.