लिटिल ब्लॉसम स्कूलच्या फुटबॉल संघाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2023-24 येथे दिनांक 17 ऑगस्ट 2023 गुरुवार रोजी धरणगाव येथे आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये लिटिल ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरीय स्पर्धा जिंकून जिल्हा स्तरीय स्पर्धेत आपल्या संघाची निवड निश्चित केली आहे.

सकाळी 09 वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका जिल्हा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर, क्रीडा शिक्षक ओसवाल सर तसेच विविध शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होऊन विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत विविध स्पर्धा गाजवल्या त्यात अंतिम निर्णय म्हणून लिटिल ब्लॉसम स्कूलच्या 17 वर्षाखालील व 14 वर्षाखालील दोघं गटाचे जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष दीपक जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती दीपक जाधव, उपमुख्याध्यापक योगेश करंदीकर यांनी विद्यार्थ्यांसह शाळेचे क्रीडा शिक्षक पवन बारी यांचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.