Friday, September 30, 2022

बिबट्याची दहशत; १६ वर्षीय मुलाला नेले उचलून

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisement -

चंद्रपूर : बिबट्याची दहशत. वीज कर्मचाऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच एका १६ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरात घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

राज भडके (वय १६, रा. नेरी, दुर्गापूर, चंद्रपूर) असे या बालकाचे नाव आहे. राज हा दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या मागच्या बाजूने जाण्यासाठी निघाला हाेता. दरम्यान, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर बिबट्याने त्याला पळविले.

या घटनेची माहिती मिळताच वन विभागासह पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. राजला तपासण्याचे काम मध्यरात्रीनंतरही सुरू हाेते. मात्र, अद्याप त्याचा शोध लागला नसून वनविभागाकडून शोध सुरूच आहे.

दरम्यान, या परिसरात वाघ व बिबट्याचे हल्ले वाढल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच वीज केंद्राने या भागात वाघ फिरत असल्याबाबत वनविभागाला माहिती दिली होती. दरम्यान, बुधवारी वाघाने कामगाराला ठार केले.

तर, गुरुवारी बिबट्याने मुलाला उचलून नेले. यानंतर नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून या जंगली श्वापदांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या