चांद्रयानने पाठविला चंद्राचा पहिला आणि सुंदर फोटो

0

नवी दिल्ली ;- चांद्रयान ३ या तिसऱ्या मानवविरहीत चांद्रयानाने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) जारी केला आहे. चांद्रयान ३ हे शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहचलं. त्यानंतर आता इस्रोने चंद्राचा पहिला फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता सर्वाना अपेक्षा आहे , की चांद्रयान ३ या महिन्याच्या २३ तारखेपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.

शनिवारी म्हणजेच ५ ऑगस्टच्या दिवशी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे. १४ जुलै २०२३ रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून LVM-3 रॉकेटच्या साह्याने चांद्रयान-3चं प्रक्षेपण झालं होतं. आता या यानाने पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळातील तीन लाख किलोमीटर अंतर व्यापलं आहे. या यानाने १ ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि चंद्राच्या दिशेने आपला ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.