टोळीने गुन्हे करणारे चौघे दोन वर्षांसाठी हद्दपार

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव शहरात टोळीत गुन्हे करणारे चार गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरात टोळीने गुन्हे करणाऱ्या इसमांविरुध्द मुं.पो. का. क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची अभयसिंह देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्याकडून चौकशी करुन ते खरोखर जिल्हयांतुन हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याचे सवयीचे त्यांना आहेत असे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना जळगाव जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहेत.

चाळीसगाव शहर पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. 07/2023 प्रमाणे सामनेवाले १) भुपेश ऊर्फ भुप्या यशवंत सानेवणे (वय २३, रा. भडगाव रोड आर. के. लॉन्स जवळ चाळीसगाव),  अभय उर्फ अभ्या हिम्मत लोहार (वय १९, रा. प्लॉट एरीया चाळीसगांव), ३) धनंजय उर्फ धन्या बाळासाहेब भोसले (वय २५, रा.  स्वामी समर्थनगर चाळीसगाव), चोंग्या उर्फ तुषार महेंद्र जाधव (वय २६, रा. नारायणवाडी पेट्रोल पंप जवळ चाळीसगाव) यांचे विरुध्द चाळीसगाव शहर पो.स्टे. ला एकूण १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर सामनेवाले यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग यांनी केलेली आहे.

सदर सामनेवाले यांनी टोळीने राहुन चाळीसगाव शहरात ठिकठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला होता. त्यांना जळगाव जिल्हयांत शांतता ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नव्हती. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने सदरचा हद्दपार प्रस्ताव हा चाळीसगांव शहर पो. स्टे. चे  संदीप पाटील यांना, पोलीस निरीक्षक  यांनी रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ व अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शना खाली पो.हे.कॉ.विनोद विठ्ठल भोई, पोना तुकाराम जुलालसिंग चव्हाण, पो.कॉ. चतरसिंग राजेंद्र महेर, मपोकॉ सबा शेख यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कडेस सादर केला होता.

एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांनी प्रस्तावाचे चौकशी अंती सामनेवाले यांना ०२ वर्षा करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पो. निरी. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफी युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ  सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.