चाळीसगाव येथे तेली समाज मेळाव्याचे आयोजन

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कृपेने जिल्ह्यातील चाळीसगाव येथे सर्व तेली समाज बंधू व भगिनी यांचा जाहीर मेळाव्याचे आयोजन चाळीसगाव येथे दिनांक १० जुलै रविवार रोजी दुपारी १ वाजता तेली समाज मंगल कार्यालय एम.जी.नगर या ठिकाणी करण्यात आलेले आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष मा. खासदार रामदासजी तडस साहेब मप्रांतै महासभा सचिव डॉ.भूषण कर्डिले, कार्याध्यक्ष मा श्री अशोक जी व्यवहारे,कोषाध्यक्ष गजाननजी शेलार ठाणे विभाग प्रमुख मा श्री सुनील चौधरी म.प्रां.तै महासभा युवा महा. सचिव नरेंद्र चौधरी चाळीसगाव तेली समाज अध्यक्ष मा श्री दिलीप रामराव चौधरी हे सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार असून जळगाव जिल्ह्यातील युवा आघाडी, वैद्यकीय आघाडी सर्व आघाड्याचे पदाधिकारी सभासद, समाज बांधव भगिनी व युवकांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.