दहशतीच्या उद्देशाने हातात तलवारी,चॉपर घेऊन फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव शहरात तलवार, कट्टा, पिस्तूलसह फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून समाजात दहशद निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळील दोन, तलवार, एक चॉपर पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी शहर पोलीस ठाण्याचे आशुतोश सोनवणे, रवींद्र
बच्छे यांना गुप्त खबर मिळाली होती.

सूत्रांनुसार, शहरातील यासिन नगर भागात काही मुले हातात तलवार व चॉपर घेऊन दहशद माजवत आहे. असेच हत्यारासह फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करीत आहे. यावरून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हा शोध पथकाने पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व त्याच्यासोबत पोलीस नाईक राहुल सोनवणे रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, पवन पाटील यांच्या पथकाने संशयित मोईन अशपाक खाटीक (१९) नाजीम नजमुद्दीन खाटीक (१९), तबरेज तौकीर खाटीक (२४) व अन्य एक (सबस्टेशन जवळ, यासीन नगर, हिरापूररोड, चाळीसगाव), आयान दयान खाटीक ( २०, त्रिमूर्ती बेकरीच्या समोर, हुडको कॉलनी) यांना अटक केली. या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.