चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यातील ३७ वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून महिला व तिच्या मुलीला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य साहाय्यक सुनील कायस्थ यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित ३७ वर्षीय महिलेवर बलप्रयेाग करून तिचा विनयभंग करीत शरीर सुखाची मागणी केली तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून या केेलेल्या कृत्याबाबत कुणास काही सांगितल्यास तुला व तुझ्या मुलीला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. ही घटना ११ जानेवारी २०२२ रोजी दुपारी 3 वाजता घडली.
याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोग्य सहाय्यक सुनिल कायस्थ याच्या विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत.