कार घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

0

पहूर;– जामनेर तालुक्यातील लोणी येथील माहेर असलेल्या विवाहितेला चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेर होऊन एक लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण व सासू-सासर्‍यांनी शिवीगाळ करून त्रास दिल्याने विवाहितेच्या फिर्यादीवरून पाऊल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ज्योती सुधाकर सोनवणे वय 21 यांचा विवाह पती सुधाकर मांगीलाल सोनवणे वय 27 यांच्याशी रीती रिवाज्यानुसार झाला होता. मात्र विवाह झाल्यापासून 17 नोव्हेंबर 2022 ते फिर्याद देण्याच्या दोन महिन्यापूर्वी पर्यंत माहेरून चार चाकी वाहन घेण्यासाठी एक लाख रुपये आणावेत या मागणीसाठी पती सुधाकर सोनवणे याने चपटा बुक्क्यांनी मारहाण करून तिला त्रास दिला. तसेच तिचे सासू-सासरे आणि ननंद यांनी माहेरहून एक लाख रुपये न आणल्यास आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी दिली त्यामुळे विवाहित्याने पोलीस स्टेशन गाठून पतीसह सासू-सासरे नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिंपी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.