केंद्राचा निर्णय ! ; पेट्रोल पंप सुरु करण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या ?

0

केंद्र सरकारने पेट्रोल पंप सुरु करण्याच्या नियमामध्ये बदल केले आहेत – यामुळे आता पेट्रोल पंपावर सीएनजी, एलएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स बसवण्याची अनुमती देण्यात आली आहे – तसेच नवीन पेट्रोल पंपासाठी अर्ज देखील करता येईल – असे केंद्र सरकारने सांगितले

कोणाला करता येईल अर्ज ?
केंद्र सरकारने सांगितले – पेट्रोल पंप उघडण्यासाठी आपल्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे – तसेच वयोमर्यादा 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावी तर उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी आपल्याकडे राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर किमान 1200 ते 1600 चौरस मीटर जमीन आवश्यक आहे. याचबरोबर शहरी भागात किमान 800 चौरस मीटर जागा असणे आवश्यक आहे – जर स्वतःच्या नावावर जमीन नसेल, तर जमीन भाडेतत्त्वावर देखील घेता येईल.तसेच पेट्रोल पंपावर वाहन चार्जिंग पॉइंट्स किंवा सीएनजी बसवणे आवश्यक आहे.

किती येईल खर्च ?
आतापर्यंत शहरी भागातील पेट्रोल पंपासाठी 25 लाख रुपये आणि ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी 12 लाख रुपयांची बँक ठेव आवश्यक होती

मात्र नवीन नियमानुसार – आपल्याकडे स्वतःची जागा असेल तर अगदी छोट्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला पेट्रोल पंप चालू करता येईल – असे केंद्र सरकारने सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.