कंकराज येथे विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा तालुक्यातील कंकराज येथे दुपारच्या सुमारास गावठाण जागेत म्हशी चरत असताना विजेचा धक्का लागून तीन म्हशी जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील कंकराज येथील भैय्यासाहेब पाटील हे कंकराज शिवारात आपल्या म्हशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चारत होते, यावेळी अचानक इलेक्ट्रिक तारांचा म्हशींना शॉक लागला, यात तीन म्हशींचा विजेच्या धक्क्याने जागेवरच मृत्यू झाला. यात शेतकरी पाटील यांचे सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत पारोळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.