बीआरएसच्या खासदारांच्या पोटात चाकू खुपसला !

0

हैद्राबाद ;- भारत राष्ट्र समितीचे ( पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती ) खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करताना रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. यात रेड्डी हे गंभीर जखमी झाले आहेत. रेड्डींना सिकंदराबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांना भाजपाचे विद्यमान आमदार रघुनंदन यांच्याविरोधात दुब्बका मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आज ( ३० ऑक्टोबर ) सिद्धीपेठ येथे प्रचार करताना एक अनोळखी व्यक्ती रेड्डी यांच्याजवळ आली. तेव्हा रेड्डींना ही व्यक्ती हस्तांदोलन करत आहे, असं वाटलं. पण, अचानक या व्यक्तीनं चाकू बाहेर काढला आणि पोटात खुपसला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.