नोकरी शोधताय ? २ लाखांपर्यंत मिळणार पगार; पहा कुठे किती जागा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.  Broadcast Engineering Consultants Indian Limited (BECIL) ने सल्लागार (Consultant), मल्टी टास्किंग स्टाफ (Multi-tasking staff), डेटा एंट्री ऑपरेटर (Data entry operator), सल्लागार आणि इतर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या रिक्त पदांमधून १९ पदे भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १४ जुलै आहे. उमेदवार BECIL च्या अधिकृत वेबसाइट becil.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

रिक्त जागांचा तपशील

वरिष्ठ सल्लागार (प्रकल्प) – ३ पदे

वरिष्ठ सल्लागार / सल्लागार (एव्हिएशन) – ३ पदे

सल्लागार / सल्लागार (MIS) – २ पदे

सल्लागार – १ पद

सल्लागार (अभियांत्रिकी) – १ पद

सल्लागार (वित्त) – २ पदे

कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक – २ पदे

डेटा एंट्री ऑपरेटर – २ पदे

मल्टी टास्किंग स्टाफ – ३ पदे

वय मर्यादा किती ?

कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी उमेदवारांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे तर इतर पदांसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे आहे.

अर्ज शुल्क किती ?

सामान्य/ओबीसी/माजी सैनिक/महिला श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये भरावे लागतील, तर SC/ST/EWS/PH श्रेणीसाठी अर्ज शुल्क ४५० रुपये आहे.

पगार किती असेल ?

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना २० हजार रुपये ते २ लाख रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

अर्ज असा करावा ?

पायरी १ : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट http://becilregistration.com वर जा.

पायरी २ : नंतर New Registration वर .

पायरी ३ : आता तुमचा अर्ज भरा.

पायरी ४ : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

पायरी ५: अर्ज शुल्क भरा.

पायरी ६ : भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.