Breaking : खडसेंचा भाजपाला रामराम निश्चित? मुक्ताईनगरमधून भाजपचा फलक हटवला,

0

नागपूर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज असून त्यांनी अनेकवेळा पक्ष सोडण्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अज्ञातस्थळी भेट घेतली. खडसे आणि पवारांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे. पवारांच्या भेटीनंतर खडसे देहरादूनला रवाना झाले.

विशेष म्हणजे मुक्ताईनगर येथील भाजपा कार्यालयावर लावण्यात आलेले ‘भाजपा कार्यालय’ हा फलक गायब झाला. यामुळे खडसे यांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चा खर्‍या ठरणार का? अशी नवीन चर्चा सुरू झाली आहे. पंकजा भाजपमध्येच राहणार, पण माझा भरोसा धरु नका, असे उघड संकेत एकनाथ खडसेंनी गेल्या आठवड्यात गोपीनाथगडावरुन दिले होते. दरम्यान, खडसे यांनी यापूर्वीही शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यामुळे खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खडसेंना मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाईल, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.