तरुणाच्या खुनाने जळगाव हादरले

0

जळगाव । तरुणाच्या खुनाने जळगाव शहर पुन्हा हादरले आहे. शहरातील कोंबडी बाजाराजवळ रात्री एका तरूणाचा खून करण्यात आला आहे. प्रशांत सिध्देश्‍वर जंगाळे ( वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हा हल्ला नेमकी कुणी केला याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नसून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

शहरातील जेएमपी मार्केटमध्ये आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. त्याच्या मृतदेहावरील खुणा बघता त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी पोलिसात नुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.