एमएससीआयटी कोर्सच्या संरचनेत बदल

0

जळगाव : एम.एस.सी.आय.टी कोर्सची संरचना आता केवळ शासकीय नोकरीसाठी उपयुक्त कोर्स किंवा आयटी अवेअरनेस अशी राहिली नाही.त्यामध्ये त्वरित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे, जॉबसाठी तयार करणारे बदल करण्यात आले आहेत. यामुळेच एम.एस.सी.आय.टीचे नवीन स्वरूप महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने सादर केले आहे. तसेच हे कोर्स आता जॉब रेडीनेस व आयटी अवअरनेस” अशा दोन पर्यायात उपलब्ध आहे. अशी माहिती व्यवस्थापक विवेक सावंत यांनी दिली.यावेळी समनव्यक संतोष बिरारी हे ही उपस्थित होते.

रोजगाराच्या सर्वोत्तम संधिंसाठी एम.एस.सी.आय.टी सोबत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून इंडस्ट्रीला पूरक, अधिक सक्षम करण्यासाठी संगणक ज्ञान देणारे विविध कोर्सेस देखिल चालवले जातात. यांना क्लिक्  कोर्सेस असे म्हटले जाते. या प्रकारचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या प्रमाणपत्र व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाची मार्कशीट दिली जाते. नोकरी मिळवून देणारे क्लिक् कोर्सेस- क्लिक् आयटी,

इंग्लिश कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, क्लिक् टॅली विथ जीएसटी, अॅडव्हान्स्ड टॅली, अॅडव्हान्स्ड एक्सेल, ऑटोकॅड, ३डी मॉडेलिंग, ३डी टेक्श्चरिंग अँड लायटिंग, डिटीपी-कोरेल, डिटीपी-ॲडोबे, फोटोशॉप, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट इलस्ट्रेटर, व्हिडीओ एडिटिंग, सी प्रोग्रॅमिंग, सी++ प्रोग्रॅमिंग, कंप्यूटर हार्डवेअर सपोर्ट, नेटवर्क सपोर्ट, सिक्युरिटी सपोर्ट, डेस्कटॉप सपोर्ट, स्कॅच प्रोग्रॅमिंग, क्लिक आयओटी ई. कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.