ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ब्राह्मण समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ब्राह्मण महाशिखर परिषद भारत व ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था यांनी आयोजित लाक्षणिक उपोषणास कार्यक्रमास समाजातून उत्स्फुर्त पाठींबा मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत विविध मागणीपार निवेदन देण्यात आले.

ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी व त्यात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. ब्राह्मण समाजावर होणारी जातीय चिखलफेक थांबविण्यासाठी व महापुरुषांची होणारी बदनामी थांबविण्यासाठी कायदा करण्यात यावा. महाराष्ट्र सदन दिल्ली तसेच संसद भवन येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात यावा. पुण्यातील शनिवार वाडा येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे शौर्य व युध्दाच्या इतिहासाचे संग्रहालय व पेशवे सृष्टी स्थापन करण्यात यावी. सी.बी.एस.सी. स्टेट बोर्ड यांच्या पाठ्यपुस्तकात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा धडा समाविष्ट करण्यात यावा.

स्वातंत्र्यवीर वि . दा . सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. ब्राह्मण समाजासाठी शेतकऱ्यांना शेतीची अवजारे व ट्रॅक्टर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यातील ब्राह्मण समाजातील विद्यार्थाना वसतिगृह बांधून दयावेत. पुरोहितांना मासिक पाच हजार रूपये मानधन देण्यात यावे. वर्ग २ च्या इनाम जमीनी या वर्ग १ कराव्या विकसीत करण्याचा अधिकार द्यावा. ब्राह्मण समाजाला के जी टु पी जी शिक्षण मोफत द्यावे. श्रीवर्धण येथील पेशवे स्मारकाची देखभाल व डागडुजी करण्यात यावी. भगवान परशुराम मंदिरासाठी विशेष धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यात यावा.

अशा विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. याप्रसंगी ब्राह्मण महाशिखर परिषद भारतचे उपाध्यक्ष अशोक वाघ व ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कमलाकर फडणीस यांनी उपोषण करण्यामागील भुमिका स्पष्ट केली. यावेळी जळगावातील ब्राह्मण समाजातील ब्राह्मण सभा नितीन कुलकर्णी, पुरोहित संघ भुषण मुळे, सुरभी महिला मंडळ स्वातीताई कुलकर्णी, जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघ व्ही. पी. कुलकर्णी, बहुभाषिक ब्राह्मण संघ अजित नांदेडकर, शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संघ अमोल जोशी, ब्राह्मण सोशल फाऊंडेशन हेमंत वैद्य, ब्रह्मश्री महिला मंडळ छायाताई वाघ व मानिनीताई तपकिरे, ब्राह्मण सेवा संस्था वसंतराव देखणे व रेखाताई कुलकर्णी, राजस्थान ब्राह्मण संघ सत्यनारायण खटोड, सिखवाल ब्राह्मण समाज संघ, खान्देश ब्राह्मण आघाडी विविध संघटनांना पाठींबा देण्याचे आवाहन केले. यावेळी ब्राह्मण समाजातील संस्थांचे पदाधिकारी, सदस्य तसेच समाजबांधव मोठया संस्थेने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.