Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»१९९३ मधील साखळी बॉम्ब आरोपी ‘अब्दुल करीम टुंडा’ची सुटका
    राष्ट्रीय

    १९९३ मधील साखळी बॉम्ब आरोपी ‘अब्दुल करीम टुंडा’ची सुटका

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 29, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अयोध्येत बाबरी पाडल्यानंतर १९९३ मध्ये देशभरात मुंबईसह ६ ठिकाणी ट्रेन्समध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. यातील एक आरोपी अब्दुल करीम टुंडा याची अजमेरच्या टाडा कोर्टाने सुटका केली आहे. तर इतर दोन आरोपी इरफा आणि हमीदुद्दीनं यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

    १९९३ मध्ये कोटा, लखनऊ, कानपूर, हैदराबाद, सूरत आणि मुंबई या शहरांमधील ट्रेन्समध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. या प्रकरणावरील सुनावणीवर सरकारी वकीलांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, टुंडा याची कुठल्या कारणांमुळं सुटका झाली, यावर निकालाचं वाचन केल्यानंतर टिप्पणी करता येईल.

    २०१३ मध्ये झाली होती अटक
    सीबीआयनं टुंडाला या स्फोटांचा मास्टरमाइंड ठरवलं होत. तसेच २०१३ मध्ये नेपाळच्या बॉर्डरवरून त्याला अटक झाली होती. टुंडा याच्यावर देशातील विविध ठिकाणी दहशतवादी कारवायांप्रकरणी खटले सुरु आहेत. टुंडा यानं कथितरित्या तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल होत. एक पाकिस्तानी नागरिक जुनैदसोबत त्यानं १९९८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला केल्याची योजना आखली होती.

    कोण आहे टुंडा?
    मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये सहभागी होण्यापूर्वी टुंडानं जालीस अन्सारीसोबत मुंबईत मुस्लिम समुदायासाठी काम करण्याच्या उद्देशानं ‘तंजीम इस्लाह उल मुस्लीमीन’ नावाची संस्था स्थापना केली होती. मध्य दिल्लीच्या दारियागंजमध्ये छत्ता लाल मिया भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने आपल्या वडिलांचं गाव गाझियाबादमध्ये सुतारकाम सुरु केलं होत.

    त्यानंतर त्यानं भंगार व्यवसायही केला. ८०च्या दशकात पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या एजंट्सच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्यानंतर तो एक कट्टरपंथी बनला.

    1993 Bomb Blast Case
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026

    गोंधळ करणाऱ्यांना हटकल्याने संगीतकाराची हत्या

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif