एअर इंडियाच्या हलगर्जीपणामुळे ८० वर्षीय वृद्धाने गमावला जीव

एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने एअर इंडियाला ३० लाख रुपयांच्या आर्थिक सेंड ठोठावला आहे. एका ८० वर्षीय प्रवाशाला व्हीलचेअर न मिळाल्याने त्याच्या मृत्यू झाल्याप्रकरणी एअरलाईन्स कंपनीला हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती मुंबई येथील टर्मिनल, अधिकाऱ्याने दिली.

विनंती करूनही विमान कंपनीने व्हीलचेअर न दिल्याने या वृद्ध व्यक्तीला पायी चालावे लागले. त्यामुळे या व्यक्तीचा मुंबई विमानतळावर मृत्यू झाला होता. एनएचआरसीने २० फेब्रुवारीला हवाई प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएला नोटीस पाठवली होती.

काय आहे घटना
मीडिया रिपोर्टनुसार, युएसस्थित भारतीय वंशाच्या एका ८० वर्षीय व्यक्तीला इमिग्रेशनसाठी १.५ किलोमोटर चालावे लागले. पायी चालावे लागल्याने दम लागून या वृद्ध व्यक्तीचा जीव गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.