दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात का असतात 28 किंवा 29 दिवस? ; लीप वर्ष म्हणजे काय ?

29 फेब्रुवारी हा वर्षातील सर्वात लहान दिवस

0

नवी दिल्ली ;- लीप वर्ष म्हणजे वर्षात 365 ऐवजी 366 दिवस असतील. दर चार वर्षांनी असे घडते हे सर्वांनाच माहीत आहे.29 फेब्रुवारी हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. लीप वर्ष कधी आणि का सुरू झाले ते जाणून घेऊया?

पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला आपण पृथ्वीचं परिवलन म्हणतो. जेव्हा ती स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते त्याला पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतो. सध्या वापरल्या जाणाऱ्या ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये साधारण वर्षाचे अंदाजे 6 तास नाहीत. 4 वर्षात हा अतिरिक्त वेळ अंदाजे 24 तास म्हणजे एक दिवस इतका होतो. अशा प्रकारे, दर चार वर्षांनी एक दिवस जोडून अतिरिक्त वेळेचे गणित दुरुस्त केले जाते. हा एक दिवस जोडल्याने लोकांची सोय होते.हा दिवस फेब्रुवारी महिन्यात मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला ‘लीप इयर’ असं म्हटलं जातं.

फार प्राचीन काळापासून ऋतू आणि कॅलेंडर यांचा मेळ घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऋतू आणि कॅलेंडरमधील तारखा यांमध्ये फार अंतर पडू नये यासाठी दरवर्षी पडणारा पाव दिवसांचा फरक लीप वर्षामध्ये भरुन काढला जातो. ज्युलिअस सिझर आणि पोप ग्रेगरी यांनी यासंदर्भात काही बदल सुचवले. त्यापैकी सर्वात आधी ज्युलियस सिझरने कॅलेंडरमध्ये बदल सुचवले.

पोप ग्रेगरीने 1582 या वर्षातील ऑक्टोबर महिन्यातून 12 दिवस वजा केले.ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष मानले जावे. त्यात 366 दिवस असतील. मात्र 1700, 1800 या शतवर्षांना (सेंच्युरी इयर) लीपवर्ष मानले जाऊ नये. ज्या शतवर्षाला 400 ने भाग जातो ते लीप वर्ष मानले जावे. जसे की 2000, 2400.

Leave A Reply

Your email address will not be published.