चेंडू समजून हातात घेतलेला बॉम्ब फुटून ५ मुले जखमी

0

 

पाटणा ;- शेळ्या चरणाऱ्या मुलांना चेन्डुसदृश्य वस्तू सापडल्याने ते खेळायला लागले असता तो फुटल्याने ५ मुले जखमी झाल्याची घटना बिहारमध्ये घडली असून हा चेंडू नसून बॉम्ब असल्याचे समोर आले आहे. बिहारच्या अररियायेथील राणीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील कॅनॉल गेटजवळ बॉम्बचा स्फोट झाला, या घटनेत शेळ्या चरणारी पाच मुले जखमी झाली. त्यापैकी एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठून सर्व जखमी मुलांना उपचारासाठी राणीगंज रुग्णालयात दाखल केले. या घटनेत अख्तरी प्रवीण या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीणसह आणखी चार मुले जखमी झाली असून, 12 वर्षीय मोहम्मद अफजल, 16 वर्षीय सोनू कुमार, 7 वर्षीय साजिद नदाफ आणि 10 वर्षीय जुल्फराज, अशी त्यांची नावे आहेत. चौघांवर राणीगंज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर अख्तरी प्रवीणला अधिक उपचारासाठी अररिया येथे पाठवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ रामपुकर सिंह मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बॉम्ब निकामी पथक आल्यावर दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.