छतावर शेकडो कुजलेले नग्न मृतदेह सापडले; गिदाधांनी तोडले लचके

0

पाकिस्तान, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाकिस्तानातील मुलतान (Multan) शहरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुलतान शहरातील एका रुग्णालयाच्या छतावर किमान 200 कुजलेले मृतदेह आढळून आले आहेत. हे कुजलेले मृतदेह शुक्रवारी मुलतानमधील निश्तार हॉस्पिटलच्या शवागाराच्या (Nishtar Hospital’s mortuary) टेरेसवर सापडले. यात अनेकांच्या शरीराचे अवयव गायब असून महिलांचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला.

पाकिस्तानस्थित पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार तारिक जमान गुर्जर यांनी सांगितलं की, एका व्यक्तीने त्यांना निश्तार हॉस्पिटलच्या शवागाराच्या टेरेसवर मृतदेह कुजल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मी निश्‍तार हॉस्पिटलला भेट देण्यासाठी गेलो होतो, तेव्हाच एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हणाला की, तुम्हाला काही चांगलं काम करायचं असेल तर शवागारात जाऊन तपासणी करा.’

जमान गुर्जन यांनी सांगितलं की, ते तेथे पोहोचले असता कर्मचारी शवागाराचा दरवाजा उघडण्यास तयार नव्हता. ते म्हणाले, ‘यानंतर मी त्यांना धमकी दिली की, जर दरवाजा उघडला नाही तर मी तुमच्याविरुद्ध एफआयआर दाखल करेन.’ ते म्हणाले की, अखेर शवगृह उघडले आणि आत जाताच त्यांना सुमारे 200 मृतदेह पडलेले दिसले. त्यात स्त्री-पुरुष दोघांचेही कुजलेले मृतदेह होते आणि तेही विवस्त्र अवस्थेत. महिलांचे शरीरही झाकलेले नव्हते.

यानंतर गुर्जनने डॉक्टरांना येथे काय चालले आहे, असे विचारले असता, वैद्यकीय विद्यार्थी अभ्यासासाठी याचा वापर करतात, असे उत्तर डॉक्टरांनी दिले. त्यांनी शवागार अधिकाऱ्यांना विचारले की तुम्ही मृतदेह विकता का? गुर्जर म्हणाले की त्यांनी डॉक्टरांना या घटनेचे स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आणि प्रत्युत्तरात डॉक्टरांनी सांगितलं की हे प्रकरण जसं दिसत आहे, तसं काहीच नाही. कारण या मृतदेहांचा वैद्यकीय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक हेतूसाठी वापर केला होता.

५० वर्षांच्या इतिहासात असं कधीच पाहिलं नसल्याचं ते म्हणाले. गिधाडं आणि किडे छतावरील ही प्रेतं खात होती. गुर्जर म्हणाले की, या मृतदेहांचा वापर वैद्यकीय शिक्षणासाठी केला जात असला तरी नमाज-ए-जनाजेनंतर मृतदेहांचं दफन योग्य प्रकारे व्हायला हवं होतं, परंतु ते अशाप्रकारे टेरेसवर फेकले गेले, हे चुकीचं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.