किनगावच्या साक्षी पाटीलचे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धत रौप्य पदकासह दुसरे स्थान

0

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शांती खेळ संघ Maharashtra Pacific Sports Association भारतीय शांती खेळ महासंघ FIT इंडिया युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय SAI भारतीय खेळ प्राधिकरण व आंतरराष्ट्रीय शांती खेळ महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत स्पर्धत महाराष्ट्र शांती खेळ संघाने यवतमाळ येथे संपन्न झालेल्या सन. २०२२-२३ या ४ थ्या राष्ट्रीय बँडमिंटन स्पर्धेत किनगाव तालुका यावल येथील खेळाडू साक्षी अनिल पाटील हिने १७ वर्षे वयोगटात रौप्य पदक मिळवले.

या स्पर्धत द्वितीय क्रमांक पटकावला व अंतरराष्ट्रीय पातळीवर बँडमिंटन स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चीत केले. साक्षीला मिळालेल्या या नेत्रदिप यशासाठी तेजस पाटील, योगेश चौधरी, पवन पाटील व क्रिडा प्रशिक्षक (कोच) चेतन पाटील व दिग्विजय पाटील यांचे बहुमुल्य असे मार्गदर्शन मिळाले.

साक्षी पाटील ही किनगाव ग्राम पंचायतचे सदस्य अनिल पाटील यांची कन्या असून तीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच साक्षीची गावात मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी साक्षीला आशीर्वाद देत पुढील स्पर्धेच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.