दूषित पाण्याची समस्या टळणार, IIT तंत्रज्ञान दमदार उपाय

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील नाल्यांमध्ये असलेल्या दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयआयटी मुंबईसोबत हात मिळवणी केली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजीने असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, ज्यामुळे नाल्यातील दूषित पाण्यावर नाल्यामध्येच प्रक्रिया करता येणार आहे. यामुळे समुद्रात किंवा नदीमध्ये दूषित पाणी जाण्याला आळा बसणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामध्ये अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या भागांमधील एकूण 25 नाल्यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेला 82 कोटी रुपये खर्च येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.