महागाईचा भडका.. आता रक्तही महागणार ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जनता चांगलीच वैतागली आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लागणारे रक्तही बाटलीमागे १०० रुपयांनी महागणार आहे.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताची दरवाढ (blood will be expensive) करण्याचे पत्रक नुकतेच राज्य रक्त संक्रमण परिषदेला पाठविले होते. त्यानंतर राज्य परिषदेने दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. यामुळे ही दरवाढ आता निश्चित मानली जात आहे. २०१४ नंतर प्रथमच दरवाढ होत आहे. रक्त आणि रक्त घटक यांच्याच किमतीत १०० रुपयाने वाढ होणार आहे.

दरम्यान, प्लाझ्मा, प्लेट लेट्स आणि क्रायो यांच्या किमतीत वाढ होणार नाही. यामुळे आता खासगी रक्तपेढ्यांमधील एका बाटलीची किंमत १,५५० होणार आहे. तसेच राज्यात ३६३ रक्तपेढ्या, ७६ रक्तपेढ्या सरकार व महापालिकेच्या, २८७ रक्तपेढ्या धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या आहेत. मात्र अनेकदा रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. त्यातच आता रक्त महागल्यावर सामान्य जनतेचे हाल होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.