सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

माजी मंत्री सुरेशदादा जैन हे गेली अनेक वर्ष राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विकासासाठी कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील हुशार परंतु आर्थिक दृष्ट्या अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजकता विकास योजनेच्या माध्यमातून उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरणासोबत शिक्षण पुरक उपक्रमांचे आयोजन गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु आहे. एसडी-सीड च्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन व कार्याध्यक्षा मिनाक्षी जैन या योजनेच्या यशस्वीतेसाठी नेहमीच तत्पर असतात.

नोव्हेंबर २०२३ या वर्षी आदरणीय सुरेशदादा वयाची ८० वर्ष पूर्ण करत आहेत. यानुषंगाने जळगाव शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील इयत्ता ८ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व आकलन क्षमता, वक्तृत्व कौशल्य विकसिक व्हावे ह्या दृष्टीने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व बौद्धिक खेळ यांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा २७ सप्टेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत चालणार आहेत. सदर स्पर्धांमध्ये प्रत्येक वर्गातून तीन विद्यार्थी निवडले जाणार असून प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात प्रेरणादायी पुस्तकं दिली जाणार आहेत. स्पर्धा एकूण १८ शाळा व महाविद्यालयांमध्ये घेतली जाणार आहे. तसेच सदर उपक्रमात ज्या शाळांना सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी ७६२०७१२३९३ या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसडी-सीड गव्हर्निंग बोर्ड चे सदस्य  महेश गोरडे हे परिश्रम घेत आहेत. उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.