एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील 12 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर जळगाव शहरात प्रवेशास मनाई आदेश

0

जळगांव – सध्या सुरु असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद निमीत्त एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्ड वरील 12 गुन्हेगारांना  शहरात येण्यास मनाई आदेश उपविभागीय अधिकारी यांनी आज काढले.

यात आकाश अरुण दहेकर, रा. जाखनीनगर, कंजरवाडा जळगाव, पियुष उर्फ वाघ्या मुकुदा ठाकुर रा. तुकारामवाडी जळगाव, रोहित उत्तम भालेराव रा. कासमवाडी ता जि जळगाव, रोशन उर्फ बबलु हिलाल धनगर, रा. सम्राट कॉलनी जळगाव, खुशाल उर्फ काल्या बाळु मराठे रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी जळगाव, मायकल उर्फ कन्हैया नेतलेकर रा. संजयगांधीनगर, कंजरवाडा जळगाव, बिजासन फकीरा घुगे रा. मेहरुण तांबापुरा जळगाव, सनी उर्फ सुनिल महादु सोनवणे रा. तांबापुरा जळगाव, लोकेश चंद्रकांत दडगव्हाळ, रा. अयोध्यानगर जळगाव, विजय गुलाब मराठे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव, कृष्णा रघुनाथ भालेराव रा. कुसुबा ता जि जळगाव, अजय विजय भिल रा. शिरसोली ता जि जळगाव यांचा समावेश आहे.

गणेशोत्सवादरम्यान गुन्हा घडु नये व सण हा भयमुक्त व शांततेत पार पडावा याकरीता एमआयडीसी पोलिसांनी त्यांना गणेशोत्सवात जळगाव शहरात प्रवेश करण्यास मनाई करणेकामी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

त्याप्रमाणे आज रोजी उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर जळगाव भाग जळगाव यांनी सीआरपीसी 144 (2) प्रमाणे आदेश काढुन त्यांना उदया असणा-या गणपती विर्सजना करीता दिनांक 28 सप्टेंबरच्या रात्री 12 ते 29 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जळगाव शहरात प्रवेश करण्यास मनाई आदेश काढलेले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत पोलीस निरिक्षक जयपाल हिरे सो. सफौ/अतुल वंजारी, पोह/दिपक चौधरी, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.