नितीश कुमार यांनी काढले बिहारच्या २२ आयएएस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश

0

पाटणा ;- नितीश कुमार यांनी बिहारमधील तब्बल २२ आयएएस अधिकारी व ४५ इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत.

नितीश कुमार यांनी बिहारमधील २३ जानेवारी रोजी २९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता त्यात शुक्रवारी बदली करण्यात आलेल्या २२ आयएएस अधिकाऱ्यांची भर पडली आहे. हे सर्व अधिकारी जिल्हा न्यायदंडाधिकारी स्तरावरचे प्रशासक होते. त्याव्यतिरिक्त बिहार प्रशासकीय सेवेतील ४५ इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

इकोनॉमिक्स टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यातील सर्वात चर्चेत असणारी बदली म्हणजे वरीष्ठ IAS अधिकारी व पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांना थेट मुख्यमंत्री सचिवालयात विशेष सचिव पदावर बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.