भुसावळ दुहेरी हत्याकांड : सहा संशयीतांना साक्रीतील ढाब्यावरून उचलले ,तर एकाला भुसावळ येथून अटक

0

भुसावळ / साक्री :- भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह एकाची हत्या करून संशयित रिपाई आठवले गटाचे माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी याच्यासह सहा हल्लेखोर हे गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एका ढाब्यातून साक्री पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे चार चाकी वाहनातून संशयित हे वेगाने गुजरातकडे जात असताना त्यांची एका वाहनाला कट लागल्याने त्या वाहन धारकाने याबाबत माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यामुळे पोलिसांनी त्या आधारे सहा संशयतांना साक्री येथील ढब्यातून जेवण करीत असताना ताब्यात घेतले. तसेच दुसरा संशयित विनोद चावरिया याला भुसावळतून अटक करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित हल्लेखोरांच्या मागावर पोलिसांची चार पथके रवाना झाली होती.

भुसावळ शहरातील मरी माता मंदिराजवळ चार चाकी वाहनाने जात असताना माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची घटना 29 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती.

मयत संतोष बारसे यांचे लहान बंधू मिथुन बारसे यांनी फिर्यादील्यावरून अकरा जणांवर भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत आरोपींचा शोध सुरू केला होता.

दरम्यान बुधवारी रात्रीच दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते यावेळी जिल्हा रुग्णालयात गुरुवारी सायंकाळपर्यंत समर्थकांसह नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मृतदेहांचे इन कॅमेरा शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी दोघांचेही मृतदेह भुसावळला रवाना करण्यात आले होते. दरम्यान संतोष बारसे यांच्या शरीरातून चार तर सुनील राखुंडे यांच्या शरीरातून पाच गोळ्या काढण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.