भुसावळात आंबेडकर जयंतीनिमित्त २९ जणांना शहरबंदी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आदी सणांच्या पार्श्वभुमीवर पाेलिसांनी विध्नसंताेषींच्या शहरबंदीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल केले हाेते. त्यावर प्रांत रामसिंग सूलाणे यांनी आदेश काढीत शहर, बाजारपेठ आणि तालुका पाेलिस ठण्याच्या हद्दितील २९ जणांना ९ ते १६ या काळात शहरबंदीचे आदेश काढले आहे. यामुळे उपद्रवींमध्ये खळबळ उडाली आहे. काेराेना संसर्गानंतर यंदा प्रथमच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी हाेणार आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, हनुमान जयंती आदी सणांच्या पार्श्वभुमीवर पाेलिस प्रशासनाने काहीही गाेंधळ आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिसांनी शहरासह ग्रामीण भागातील सुमारे २९ जणांच्या शहरबंदीचे प्रस्ताव तयार करून ते प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविले हाेते. या प्रस्तावांसाेबत संबधितांविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सुूध्दा पाठविली हाेती. याच पार्श्वभुमीवर प्रांताधिकारी यांनी २९ जणांच्या १६ एप्रिलपर्यतचे शहरबंदीचे आदेश पारित केले आहे. यामुळे उपद्रवींमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरबंदीचे आदेश पाेलिसांकडून संबंधितांना बजाविण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दितील १३, बाजारपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून आठ व तालुका पाेलिस ठाण्याच्या हदि्दती सुध्दा आठ अश्या २९ जणांवर शहरबंदीचे संक्रांत आली आहे.

यामध्ये बाजारपेठ पाेलिस ठाण्या हद्दितील एजाज खान, सिध्दार्थ जाधव, उमेर हासिफखान, आदील शेख युनुश शेख, शाहरूख खान इकबाल खान, जुनेद फिराेज कुरेशी, धीरज उर्फ सलमान खान, विशाल टाक यांचा समावेश आहे. यांना नाेटिसा बजावण्याचे काम सुरू आहे.

तर शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दितील तब्बल १३ जणांचा यात समावेश आहे. यात करण परदेशी, दिपक उर्फ टापऱ्या साेनवणे, गाैरव बढे, साैरभ कुटे, राज भालेराव, शामल काेळी, इम्रान उर्फ इमु पिंजाारी, शाहरूख पिंजारी, चंद्रकांत चाळे, याेगेश काेळी, करण इंगळे, हर्षल उर्फ छन्नू राणे व आकाश ढिवरे यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.