लोडशेडिंगमुळे वरणगावचा पाणी पुरवठा विस्कळीत; पाणी बचतीचे अवाहन

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव वीज वितरण कंपनीने लोडशेडिंग सुरु केल्याने तपत कठोरा येथून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने पाण्याची बचत करण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तपत कठोरा येथील पंप हाऊस व परिसरात विज कंपनीने लोडशेडिंग सुरु केल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावे, नळाला तोटया बसावाव्या, पाण्याचा अपव्याय करू नये, पाण्याने आपली वाहने धुवू नये, विनाकारण शैचालयात पाणी सोडू नये असे आवाहन करण्यात आले असून नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने ज्या प्रभागात पाणी सोडले त्या भागात नगर परिषदेचे पथक फिरणार आहे. ज्या नळास तोट्या नाही व विनाकारण पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास त्या नागरिकावर दंडत्मक कारवाही करणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना सुचीत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.