पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण; कुख्यात गुंडाची धिंड काढत आणले पोलिस ठाण्यात

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

बाजारपेठ पोलिसांचे पथक रात्रीच्या गस्तीवर असतांना एका संशयिताला हटकल्यानंतर करणी सेनेचा खान्देश अध्यक्ष व पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात निखील राजपूत याच्यासह टोळक्याने बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकालाच जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची संतापजनक घटना भुसावळ शहरातील श्रीराम नगराजवळील हनुमान मंदिराजवळ शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 रोजी घडली होती.

या प्रकरणी निखील राजपूतसह आठ जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र संशयित पसार झाले होते. निखील राजपूत हा श्रीराम नगरातील निवासस्थानी आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी पोलिसांनी घरी जावून त्यास अटक केली व नंतर त्याची धिंड काढून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड हे रात्र गस्तीवर असतांना श्रीराम नगरातील हनुमान मंदिराजवळ दोन विना क्रमांकाच्या दुचाकीसह एक पांढर्‍या रंगाची झायलो दिसल्याने त्यांनी उभ्या असलेल्या संशयिताला नाव विचारले असता त्याने निलेश ठाकूर नाव असल्याचे सांगितले, तर याचवेळी पाच ते सहा संशयीत तेथे जमले व निखील राजपूत याने मी उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अध्यक्ष असून माझ्यामागे राजकीय गॉडफादर असून माझे काही वाकडे होणार नाही, असा दम भरला तर निलेश ठाकूर व आकाश पाटील याने एक मर्डर किया है, एक और करेंगे, असे सांगत संघटित टोळीच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी निखील राजपूतने तू नवीन अधिकारी आहे, नवीन सारखा रहा, असे सांगत मानेला दाबण्याचा प्रयत्न करीत उपनिरीक्षकांना मारहाण केली होती व माझ्याजवळील पिस्टलने तुला मारून टाकेल, अशी धमकीही दिली होती शिवाय नकूल राजपूत याने शिविगाळ केली होती.

या गंभीर घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल आरोपी निखील राजपूतसह अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, निलेश ठाकूर व अन्य एका अनोळखी विरोधात भाग पाच, गुरनं.307, 353, 332, 143, 147, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.