जामनेर तालुका निरीक्षक पदी भुसावळच्या संगीता भामरे यांची नियुक्ती

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे कार्यालय येथे प्रांताध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महिला प्रांताध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ताई ठाकरे, डॉ. आशाताई मिरगे, माजी आमदार विद्याताई चव्हाण यांच्या उपस्थितीत नुकतीच जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक महिला निरीक्षक अशा 15 निरीक्षक महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये जामनेर तालुका निरीक्षक पदी भुसावळच्या संगीता राजेंद्र भामरे यांची नियुक्ती झाली आली असून अन्य तालुक्याचे निरीक्षक पदावर छाया सावळे,
माया बारी, प्रतिभा तावडे, प्रा. मंगला शिंदे, योजना पाटील, उषा निळे, लता सावकारे, मिना बाग, कविता पवार, निता पाटील, द्वारका पाटील, सुनंदा शेंडे, आशा चावरीया, प्रा. सुनीता मांडोळे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

सर्व महिलांना महिला प्रांताध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी नियुक्तीपत्र दिले.

याप्रसंगी सर्व निरीक्षकांचे अभिनंदन करीत जयंत पाटील, छगन भुजबळ व रुपाली ताई चाकणकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांवर होणारे अत्याचार व संबंधित कायदे याबाबत योग्य मार्गदर्शन सुरेखा ताई ठाकरे आणि विद्याताई चव्हाण यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस संगीता भामरे यांची जामनेर तालुका निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यासह तालुक्यातून राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.