खादगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी रुपाली चिंचोले यांची बिनविरोध निवड

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील खादगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिभा पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपला असता त्यांनी स्वच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्याजागी एकही अर्ज न आल्याने त्यांची सरपंच ज्योती संदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली रुपाली चिंचोले यांची ग्रामसेवक चंद्रशेखर सोनवणे यांच्या उपस्थित बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच ज्योती चौधरी व भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली चिंचोले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पद्माकर चौधरी, विश्वनाथ गोरडे, भगवान ढेकाळे, राजू चिंचोले, दीपक पाटील, संदीप चौधरी, राहुल पाटील, गणेश भोईटे, प्रवीण चिंचोले, प्रदीप चिंचोले, डॉ. विनोद भोई, मधुकर चिंचोले, धोंडू सूर्यवंशी, मुकेश चौधरी आदीसह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.