फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

रेल्वे गाड्यांना वाढलेल्या गर्दीत फुकट्यांची संख्या वाढल्याने अशा प्रवाशांविरोधात 17 व 18 रोजी विशेष मोहिम राबवण्यात आली. त्यात सुमारे तीन लाखांचा दंडात्मक महसूल रेल्वेला मिळाला. डीआरएम एस.एस.केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वाणिज्य व प्रबंधक (तिकीट तपासणी) आर.डी.क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबवण्यात आली.

बुधवारी चाळीसगाव-धुळे विभागात दोन आरपीएफ कर्मचारी व नऊ तिकीट तपासणीसांच्या माध्यमातून 96 प्रवाशांकडून 43 हजार 435 रुपयांचा महसूल मिळाला. गुरुवार, 18 मे रोजी 15 तिकीट तपासणी मोहिम राबवत 314 प्रवाशांकडून दोन लाख 35 हजार 550 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) आर.डी.क्षीरसागर व सहायक वाणिज्य प्रबंधक (कोचिंग) यांच्यासह विभागीय तिकीट तपासणी निरीक्षक पवार यांनी मोहिम सहभाग नोंदवला. दोन दिवसात दोन लाख 98 हजार 985 रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

यातील काही जखमींना चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात तर काही जखमींना धुळे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. एकाच वेळी तब्बल १३ ते १४ ग्रामस्थांना श्वानाने चावा घेतल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.