भरत अमळकरांच्या हस्ते लोकशाही वर्धापन दिन स्वागतिकेचे प्रकाशन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

दैनिक लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता शिवकुल संवाद आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे १३ वे वंशज ‘ संभाजी राजे छत्रपती’ (Sambhaji Raje Chhatrapati) यांची विशेष उपस्थिती असणार आहेत.

या कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिकेचे प्रकाशन केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर (Bharat Amalkar) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सदर कार्यक्रमाची संपूर्ण माहिती जाणून घेत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सोबतच एका राजघराण्यातील व्यक्तीचे स्वागत हे तेवढ्याच अनोख्या पद्धतीने करण्यात यावे अशी अपेक्षा ही व्यक्त करत सदर कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. या विशेष कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपती यांच्याशी ’शिवकुल संवाद’ या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम हा रविवार २८ मे रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव येथे सायंकाळी ०६:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी शहरातील तथा जिल्ह्यातील नागरिकांनी या ‘शिवकुल संवाद’ आणि ‘दै. लोकशाही वर्धापन दिन’ या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशाही समूहातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी बैठक व्यवस्था असल्याने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशाही समूहातर्फे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क असणार आहे. यावेळी चंदन कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.