भुसावळमार्गे पुणे-गोरखपूर दरम्यान धावणार विशेष गाडी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या रेल्वे गाड्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारे गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वकडून देखील उन्हाळी विशेष गाड्या चालविल्या जात आहे. यातच रेल्वेने पुणे-गोरखपूर दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळमार्गे धावणार आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

01431 स्पेशल पुण्याहून 21.04.2023 ते 16.06.2023 (9फेऱ्या) दर शुक्रवारी पुणे येथून 16.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.00 वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर ही गाडी भुसावळ स्टेशनला रात्री 00:15 वाजता पोहोचेल.

तसेच 01432 स्पेशल गोरखपूर येथून 22.04.2023 ते 17.06.2023 (9 फेऱ्या) दर शनिवारी 23.25 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 07.15 वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी भुसावळला रात्री 22.40 वाजता पोहोचेल

या स्टेशनवर आहे थांबा
दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद

रचना: एक AC-2 टियर, 4 AC-3 टियर, 11 स्लीपर क्लास आणि 6 जनरल सेकंड क्लास दोन गार्डच्या ब्रेक व्हॅनसह.

आरक्षण: आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर विशेष ट्रेन क्रमांक 01431 साठी बुकिंग सुरू होईल. वरील ट्रेनचे सर्वसाधारण द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून धावतील.प्रवाशांनी त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याची विनंती केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.