भुसावळ येथे चिमुकल्यांची ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

शाळेतील प्री- प्रायमरी स्कूल मधील सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालकांनीही हजेरी लावली.

चिमुकल्या मुलांमध्ये पुढील वर्गात जाण्यासाठी उत्साह दिसून आला. विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, घेतलेली काळजी आणि प्रेमाबद्दल आभार मानले. सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक प्रमुख अतिथी डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी केले. शाळेतील शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांचा सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.