भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई ; गुन्हा दाखल

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळात विना परवानगी दवाखाना आणि औषधांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या पथकाने हि कारवाई केली. याबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथे संशयित आरोपी शमशीर कादीर शेख (वय-४१) रा. कौसा मुंब्रा, ठाणे हा व्यक्ती विनापरवाना बी.यु.एम.एस. डॉक्टर असलेल्या डॉ. शेख अमजद शेख अहमद रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश यांच्या नावाने रजिष्ट्रेशन केलेल प्रमाणपत्राद्वारे डॉक्टर असल्याचे भासवून रूग्णांना चुकीचे औषध देत असल्याची गोपनिय माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता धडक कारवाई केली. पथकाने संशयित आरोपी शमशीर कादीर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विनापरवाना विक्रीसाठी आणलेले २३ हजार ८६८ रूपये किंमतीचे औषधींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोग्य अधिकारी बाळासाहेब श्यामकांत बावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शमशीर कादीर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.