बहुगुणी माका (भृंगराज)

0

लोकशाही विशेष लेख

 

भृंगराज (Bhringraj) ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. आपण खातो तो मका नव्हे बरं का! हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते. औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो. आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात. जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो. केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.

जरा न येता पुष्कळ दिवस जगण्यासाठी व केस काळे राहण्यासाठी पुष्य नक्षत्री माक्याची झाडे उपटून आणून स्वच्छ धुऊन मुळे वेगळी करावी व झाड वेगळे कराय यांना सावलीत दोन दिवस व उन्हात दोन दिवस वाळवून वेगवेगळे खलबत्यात कुटून वस्त्रगाळ चूर्ण करावे. पुष्य नक्षत्री मुळीचे चूर्ण १ तोळा भाताच्या पेजेतून घ्यावे व दररोज फांद्याचे चूर्ण १ तोळा तिळ तेल २० मिली यातून घ्यावे. असे १ वर्ष घ्यावे किंवा ३ महिने घ्यावे.
माक्याचा रस चाई, टक्कल किंवा केस काळे करायचे आहे यासाठी आगोदर डोक्याचे सर्व केस काढून नंतर माक्याचा रस चोळावा व पोटात पण पंचवीस मिली घ्यावा किंवा माका चुर्ण एक चमचा व काळे तिळ एक चमचा असे खाऊ शकतो फक्त अट एवढीच आहे की २१ ते ४१ दिवस दुध भात हेच अन्न खाऊन राहायचे.

महिलांनी एक ली. भृंगराज रस व एक ली. खोबरेल तेलात शिजवून थंड करून गाळून डोक्यास लावावे. केस गळणे, पिकणे, टक्कल पडणे ह्या समस्या जातात. माका रस व दुध भात यावर ४१ दिवस काढले तर शरीर रोगमुक्त होऊन तारुण्य मिळते, कायापालट होते. आवळा चूर्णाला माक्याच्या रसाच्या सात भावना देऊन सावलीत वाळवून दररोज एक चमचा मधासोबत जो एक वर्ष खाईल त्यांना काय फायदे होतील ते आम्हांस कळवणे. सर्व रोग जाऊन निरोगी जीवन होईल. दाढ दुखत आहे तिच्या विरुद्ध कानात माका रस थोडा गरम करून चार थेंब टाकावा दाढ दुखी राहते. भंगदरावर माक्याची चटणी बांधत जावी भंगदर बरा होतो. कानातील नाद, गोम, गोमाशी, किडा, मुंगी जाणे यावर माका रस कानात घालावा किंवा साधे मिठाचे पाणी घालावे. कावीळात दोन्ही वेळा दोन चमचा माका रस दररोज ७दिवस पाजावा, तेलकट वर्ज..

बटाटा, मका पावडर 5 ग्रॅम तिळाचे तेल आणि 4 चमचे घ्या. गंध वाता, अर्ध डोके दुखी येत माका रस नकात चार पाण्याचा एक थेंब घ्या, तो सुगंध समजण्यासाठी खर्च येतो. तीन ते सात दिवस. रेल कान फुटल्यास, तुळस आणि माका रास, दोन्ही थेंब थोडे मऊ करून कानत टाकवा. अर्ध डोके दुखीमध्ये माका रसात मिरे पावडर घालून मस्तकी लेप द्यावा. डुक्कर दास माका व हळद पाण्यासोबत वाढून प नाळगुदास शरीरावर किंवा चेह-यावर अचानक सुन येते त्यावर माका १ तोळा पाला व पाच लसून पाकळी याची गोळी कुटून खावी असे ३ दिवस खावे स-दुखा कोणत्याही दुखणा या भागावर पाला चटणी चोळावी. चावा, जखम, इसब, खरुज, कोड, बात, हे बरे होतात. + उच्च रक्तदाब याच्या रसाने सामान्य होतो दोन चमचा रस दररोज साठ ते नव्वद दिवस घ्यावा.
वाताची मुळव्याध माका पाने नव्वद ग्रॅम व मिरी वस्त्राव पावडर दहा ग्रॅम एकत्र कुटून वटाण्यासारख्या मो करून शिळ्या पाण्यासोबत एक गोळी घ्यावी व कोंबावर पण पाण्यात उगाळून लावावी. मुले, महिला माती खात असतील तर स.-दु- स. एक- एक चमचा माका रस द्यावा माती खाणे विसरून जातात. पुरुषांनी डोक्यासाठी माकारस तीळ तेलात सिद्ध करून वापरणे व दररोज रात्री झोपतांना हे तेल लावावे.

संतोष ढगे, सांगली
8208426494

Leave A Reply

Your email address will not be published.