राज्यपाल पुन्हा वादात, मॉडेलचे राजभवनातले फोटो व्हायरल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे सातत्याने वादात अडकत आहेत. आता कोश्यारी एक मॉडेलमुळे (Model) पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजभवनातले (Raj Bhavan) मॉडेलचे फोटो समोर आले आहेत. मायरा मिश्रा (Maera Mishra) या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत आणि राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मनसे नेते मनोज चव्हाण (MNS Manoj Chavan) यांनी याविषयी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही? या ट्वीटनंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.