कनाशी येथे शेतकऱ्याच्या घरातुन ५० हजार रुपये चोरी,गावात ३ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील कनाशी येथील धनराज रुपला पाटील या शेतकऱ्याच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडुन घरात ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला धनराज रुपला पाटील या शेतकर्याच्या फिर्यादिवरुन अज्ञात आरोपी चोरटयाविरुद्ध भा.द.वी.कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.२७ रोजी मध्यराञी घडली आहे. त्यात अजून २ घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला.

माञ चोरटयांच्या हाती काहीच न लागल्याने चोरीचा चोरटयांचा प्रयत्न फसला. माञ कनाशी गावात घरफोडी चोरीच्या घटनेने नागरीकांसह शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. पोलीसांनी या चोरटयांना जेरबंद करावे. अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे. यापुर्वीही कनाशी परीसरात जनावरे चोरीस गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.याबाबत माहिती अशी, कनाशी येथील धनराज रुपला पाटील या शेतकर्याच्या घराचा पहिल्या मजल्यावरच्या मागील दरवाजाचा आतुन लावलेला कडी कोंडा तोडुन अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश केला. व खुर्चीवर ठेवलेल्या पँटच्या खिशातील ३० हजार रुपये व स्टोअर रुमच्या दरवाजास लावलेले कुलुप तोडुन रुममध्ये पृष्ठाच्या खोक्यातील २० हजार रुपये असे एकुण ५० हजार रुपये अज्ञात चोरटयाने चोरले आहेत.

घटना स्थळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस हेड काॅन्सटेबल जिजाबराव पवार यांनी पाहणी करुन पंचनामा केला. इतरही २ घरांवर चोरीचा प्रयत्न झाला. माञ तेथे चोरटयांचा चोरीचा डाव फसला. हाती काहीच न लागल्याने चोरटयांना खाली हात परतावे लागले. माञ या चोरी घरफोडीच्या घटनेने नागरीक भयभीत झालेले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस काॅन्सटेबल जिजाबराव पवार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.