गुगल क्रोममध्ये फिंगरप्रिंट लॉक फीचर ; जाणून घ्या अपडेट

लोकशाही न्युज नेटवर्क

तुम्हालाही तुमच्या फोनच्या ब्राउझरची हिस्ट्री कोणीतरी पाहू शकते याची काळजी वाटत असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. गुगलने आपल्या क्रोम ब्राउझरसाठी नवीन सुरक्षा अपडेट जारी केले आहे. फिंगरप्रिंट लॉक फीचर आता गुगल क्रोममध्ये आले आहे.

गुगल क्रोमचे फिंगरप्रिंट लॉक फिचर इनकॉग्निटो (incognito) मोडसाठी जारी केले गेले आहे, जो एक खाजगी मोड आहे. हे फिचर फक्त अँड्रॉइड (Android) फोन आणि टॅबलेट वापरकर्त्यांसाठी आहे. गुगल क्रोम ब्राउझरमध्ये हे फीचर सुरू केल्यानंतर, अॅपमधून बाहेर येताच इनकॉग्निटो मोड लॉक होईल.

यानंतर ब्राउझर उघडण्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करावा लागेल. व्हॉट्सअॅपचे फिंगरप्रिंट लॉक फीचर जसे काम करते त्याच पद्धतीने हे फीचर काम करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की बायोमेट्रिक लॉक फीचर 2021 मध्ये पहिल्यांदा iOS डिव्हाइसेसवर इनकॉग्निटो मोडसाठी रिलीज करण्यात आले होते.

गुगलने एका ब्लॉगद्वारे गुगल क्रोमच्या या फीचरची माहिती दिली आहे. गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, गुप्त टॅब पुन्हा उघडण्यासाठी वापरकर्त्यांना बायोमेट्रिक लॉकचा वापर करावा लागेल. अशा परिस्थितीत आता फक्त ज्या व्यक्तीचा फोन आहे तोच फोनचा इनकॉग्निटो मोड उघडू शकतो

Comments are closed.