“स्व.बापुजी युवा फाऊंडेशन” आयोजित होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक लखीचंद प्रकाश पाटील व भडगाव न.प.च्या मा.नगरसेविका समिक्षा लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून ‘स्व.बापुजी युवा फाऊंडेशन’ मार्फत भडगाव मधील माता-भगिनिंसाठी मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रांतीनाना माळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला. पैठणीचा हा कार्यक्रम भडगाव मधील शेतकीसंघ प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. भडगाव मध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जवळपास ३००० महिलांनी सहभागी होत सुरेल कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते ‘क्रांतीनाना माळेगावकर’ व बाल कलाकार, गायक ‘सह्याद्री माळेगावकर’ तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील व त्यांच्या पत्नी पाचोरा न.पा.च्या मा.नगराध्यक्षा सुनिताताई पाटील उपस्थित होत्या.
यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, लखीचंद पाटील व समिक्षा पाटील यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून भडगाव मधील महिलांसाठी घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद असून महिला भगिनींचा रोजच्या जीवनातील एक दिवस अनोखा करून रंजक असा खेळ व मनोरंजक ठरलेला आहे, तसेच लखीचंद पाटील हे युवा नेतृत्व असून स्व.बापुजी युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत. त्या नंतर विजेत्या महिलांना फ्रीज, पैठणी, साड्या, दहा हजारांचे रोख पारितोषिकसह विविध गृहउपयोगी वस्तूंची बक्षिसे देण्यात आले. सर्व सामील महिलांनी स्व.बापुजी युवा फाऊंडेशन मार्फत लखीचंद पाटील व समिक्षा पाटील यांनी भडगाव शहरात अनोखा कार्यक्रम राबविल्याबद्दल महिलातर्फे आभार व्यक्त केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.